About कुशल अडसोड

मी कुशल, एक पुस्तकी किडा आणि ठार संगणक वेडा असा काहीसा मिश्रित मनुष्य.'तबला' आणि भावगीतांचा निस्सीम चाहता.सध्या अभियांत्रिकी चे शिक्षण घेतोय आणि 'स्व' शोधण्याचा प्रयत्न पण करतोय.बघू हा 'लेखनप्रवास' कुठवर जातो ते !

दिवस असे कि..

आज एका फ्रेंड चा फोन  आला (मुद्दामहून फ्रेंड, ‘तो’ किंवा ‘ती’ या भानगडीमध्ये मी पडत नाही ).तर मांडायचा मुद्दा असा कि माझ्या फ्रेंड ला सध्याच्या सुट्ट्या जाम बोर होत आहेत.अगदी ‘आता जगण्याचा कंटाळा आलाय’ या वाक्यापर्यंत तो (संदर्भासाठी ‘तो’ 😀 )आलाय.
आता मला हे कळत नाही, काल-परवा पर्यंत सुट्ट्या नाही म्हणून जगण्याला अर्थ नाही आणि आज सुट्ट्या आहे तरीही जगण्याला अर्थ नाही,हे असा दुट्टपी वागण मनुष्यालाच जमत.खरतर या उमेदीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काहीतरी करून दाखवायला पाहिजे.’लाथ मारीन तिथून पाणी काढीन’ असा आपला बाणा असायला पाहिजे.
कळत कि आता स्पर्धा खूप वाढलीये ,तान-तणाव हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे म्हणून सुट्ट्यांमध्ये पण काहीतरी करायला सांगण हा शुद्ध मूर्खपणा आहे,पण म्हणून काय अवसान गळून बसायचं? मला सांगा सुट्ट्यांमध्ये बरच काही करण्या सारख असत हा मुद्दा लोकांना कळत का नाही? सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे आपल्या छंदाला याच कळत आपल्याला वाव देता येईल त्याला अजून वृधिंगत करता येईल,नाही का? किवा अगदी मनसोक्त भटकता येईल,दऱ्या खोऱ्या अगदी पूर्णपणे पिंजून काढता येईल.भीती याची आहे कि एकदा तरुणाई मधून वजा झालेल्या सुट्ट्या कधी परत नाही मिळणार हे आपण ‘डोस्क्यात’ बसवून घ्यायला पहिजे.मग एकदा पाठीला बाक यायला लागला कि सुट्ट्या ह्या स्वप्नातच कळतात. खर तर सुट्ट्यांच महत्व ह्या शहरीकरणामुळेच कमी झालंय,अरे वर्षभर अगदी उमेदीने काम करण्यासाठी सुट्ट्या तर हव्यातच ना!
आधीच्या सुट्ट्या म्हणजे दिवसभर धिंगाणा! विहिरीवर आंघोळ, म्हशीला धुवायचं, आणि स्वत:सुद्धा रेड्यासारखं डुंबायचं, आजीची नजर चुकवुन तीने आपल्याचसाठी बनवलेला खाऊ चोरुन धुम पळायचं,कधी असंच माळ्यावर पडून रहायचं,….. असे मस्तपैकी दिवस जायचे. दुपारी उन जास्त असेल तर घरची मोठी लोकं बाहेर पडू द्यायची नाहीत, अश्यावेळी मग बाहेर सारवलेल्या अंगणात चटई घालून पत्ते खेळायचे….मजा मजा असायची! आधी बरोबर सुट्ट्या असल्या कि लग्न जुळायची मग सगळा गोतावळ एकत्र येऊन अगदी दंग व्हायचा; दंगा करायचा.
पण आता हे सर स्वप्नवत झालंय.आताच्या सुट्ट्या म्हणजे घरात स्वताला कोंडून घेणे आणि माझ्या त्या फ्रेंड सारखा ‘अघोरी’ विचार करणे अश्या झाल्याय.या ठिकाणी संदीप खरेंची कविता बरोबर सार्थ ठरते. ते म्हणतात ‘कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो,आताश्या मी फक्त रकाने दिवसांचे भरतो’

मान्य आहे परिवर्तन आवश्यक आहे ,तो आयुष्याचा भाग आहे..पण एक गोष्ट मनापासून सांगतो त्यासाठी  सुट्ट्या आणि उमेदिसोबत तडजोड करणे आपल्याला तर बुवा नाही जमणार…छे, नाहीच नाही…

तु आणि पाऊस !

काल अचानक पाऊस बरसला.
वाटल,याच हे नेहमीचच…
कधीही केव्हांही येण,
त्रेधातिरपिट उडवून गोंधळ घालण…

पण या वेळीच्या पावसामध्ये काही गुपित दडले होते,
जणू राजरोसपणे त्याचे थंड थेंब चेहऱ्याशी लगट करत होते…

प्रेमाच्या या वर्षावासंगे भिजण्यास मीही तयार झालो,
तुझ्या आठवणींसोबत दंगेखोर पावसाशी मीही दंगा घालू लागलो…

पण..त्याने हे हेरले की तू इथे नाही,
आठवणींच्या फुलांसोबत त्याला काही देणेघेणे नाही…

मोक्याच्या वेळी तो पाठमोरा होऊन हळूच पळून गेला,
ऐन बहराच्या वेळी पानगळ देऊन गेला…

आता पाऊसही नाही…आणि आता गोंधळही नाही…
आता पाऊसही नाही…आणि आता गोंधळही नाही…
तुझ्या कोरड्या आठवणी घेऊन मी निशब्द उभा आहे…
तू कधी येणार? फक्त तुझीच वाट मी पाहतोय…
फक्त तुझीच वाट मी पाहतोय…

स्मरणातील गाणी :भाग २

मराठी संगीत सृष्टीतील एक प्रसिद्ध आणि यशस्वी नाव, ज्याने आपल्या आवाजाने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनावर छाप पाडली. ज्याची ‘राधा ही बावरी’ आणि ‘गालावर  खळी’ आजही गुणगुणली जाते, असा हा मराठी गीतांच्या सुमधुर विश्वातील एक नवीन आणि सुप्रसिद्ध गायक म्हणजे ‘स्वप्नील बांदोडकर’.स्वप्नील ची प्रेमगीते असो वा भक्तिगीते सारीच खूप हिट आहेत.’सावली’ या मराठी चित्रपटामध्ये स्वप्नील ने आपले अभिनय कौशल्य पण दाखविले.सध्या स्वप्नील एका रियालिटी शो चा परीक्षक आहे.या प्रतिभावंत गायकाची हि काही गाजलेली गाणी.

राधा ही बावरी…

आहे मजा जगण्यात या…

राधे कृष्ण नाम…

छान किती दिसते फुलपाखरू…

हा चंद्र तुझ्यासाठी…

मनात माझ्या…

गालावर खळी…

माझी होणारी ‘गाडी’…

हं ,मला बरोबर आठवतंय जेव्हा मी लहान होतो प्रत्येकाप्रमाणे मलाही मोठ्या चारचाकी अवजड गाड्यांच आकर्षण होत.ट्रक आणि  ‘महामंडळाची बस’ हि माझी आवडती वाहने.
काळ बदलला,जस जस वय वाढू लागला माझ आकर्षण आकाराने कमी अवजड आणि कमी चाके  असलेल्या गाड्यांमध्ये वाढू लागल.जेव्हा मी १० वर्षांचा होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामांकडे यायचो आणि स्कूटर वर बसणे म्हणजे मला स्वर्गसुख वाटत होत.आणखी काळ बदलला आणखी वय वाढल आणि माझ लक्ष तब्येतीने कमी असलेल्या ‘स्लिम’ गाड्यांकडे वळाल.आता मी हिरो- होंडा च्या प्रेमात होतो…मग जेव्हा गाडी चालवायला शिकलो,तेव्हा ‘आजच आकाशी झेप घेईल ‘! अशी स्वप्ने मला पडू लागली.

मी हे विसरलो होतो कि माझे गाडी प्रेम जसे उतरत्या क्रमाने होते त्याहूनही दुप्पट वेगाने चढत्या क्रमाने पेट्रोल चे भाव वधारत होते.जेव्हा पेट्रोल चे भाव ५० रु च्या आसपास होते तेव्हा ठरवलं होत कि पदवीधर झालो कि एक ‘सुंदर’ गाडी घेऊ…पण आता असा वाटतंय एखादी नवीन ‘सायकल’ घ्यावी ;D (जेव्हा पेट्रोल ७१ रु प्रती लिटर आहे) आणखी एका वर्षाने पदवी मिळेल …गाडी पण मिळेल(?) पण पेट्रोल??? ते मिळेल? (कदाचित १५० रु प्रती लिटर ने मिळेल).आता अस वाटतंय कि अवजड गाड्यांची इच्छा बाळगत सुरु झालेले हे स्वप्न ‘सडपातळ’ सायकल वर येऊन संपेल…
आता विचार करतोय जेव्हा पृथ्वीच्या पोटातील  पेट्रोल संपेल तेव्हा काय होईल??? विचार न केलेलाच बरा.. 🙂

भगवद्गीता…

भगवद्गीता…साऱ्या जगाचे सार जणू आपल्याला भेट देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला केलेला उपदेश.भगवंतानी सांगितलेल्या त्या ज्ञानाचा उद्देश फक्त अर्जुनाला उपदेश करण्यासाठी नव्हता,तर अर्जुनाला माध्यम बनवून संपूर्ण मानवजातीला एक दिशा देणे,मानव संस्कृतीची घडी बसवणे हे भगवंताना त्यामधून सध्या करावयाचे होते.जेव्हां सामान्य मनुष्य संकटाना घाबरून किवा आपले कर्तव्य विसरून संकटाना पाठमोरा होतो तेव्हा हेच गीतेचे ज्ञान त्याला संकटाना सामोरे जाण्याची प्रेरणा देते.
सामान्यतः आजच्या घडीला आपण गीतेचे विविध पैलू ,जे कि विविध महान व्यक्तींनी आपल्या समोर मांडले आहेत त्यांचा अभ्यास करतो जसे कि वेद्व्यासांची ११ उपनिषदांपासून बनलेली ‘भगवद्गीता’..ज्ञानेश्वर महाराजांची ‘ज्ञानेश्वरी’..विनोबांची ‘गीताई’ …टिळकांचे ‘गीतारहस्य’..तर अगदी आताच्या काळातील Ranchor Prime यांची अनुवादित भगवद्गीता आणि डॉ. बालाजी तांबे यांचे गीतेवरील विवेचन आणि अजूनही बहुतायांचे गीतेवरील भाष्य.
पण शेवटी एकच सत्य समोर येते कि गीता कुठलीही असो सार एकच आहे.त्याचा मूळ घाभा एकच आहे तो म्हणजे कर्म आणि कर्मफळ.

आजचे युग कि जे अधोगतीकडे जात आहे त्यातून गीतेचे सारच आपल्याला तारू शकते.
गीताई माउली माझी,तिचा मी बाळ नेणता.
पडता रडता घेई ,उचलोनी कडेवरी.

स्मरणातील गाणी :भाग 1

मराठी भावगीतांच्या दुनियेतील एक प्रतिष्ठेच आणि लाडक नाव म्हणजे अरुण दाते.त्यांनी गायलेली युगल गीते म्हणजे जणू वसंताचा मोहोर.अरुण दातेंची जशी एकल गाणी प्रसिद्ध आहे तशीच युगल गीते सुद्धा ,विशेषत: अनुराधा पौडवाल यांच्या सोबतची त्यांची काही गाणी विशेष गाजली..नावारूपाला आली.या अति उच्च कोटीच्या गायकाला सादर प्रणाम.
त्यांची हि मोजकी आणि सुप्रसिद्ध १२ गाणी.

गीत :दिल्या घेतल्या वचनांची…

गीत :मान वेळाउणी धुंद बोलू नको…

गीत :डोळे कश्या साठी…

गीत :भेट तुझी माझी स्मरते…

गीत :डोळ्यात सांजवेळी…

गीत :दिवस तुझे हे फुलायचे…

सुरुवात…

मी काही दर्जेदार लेखक नाही…आणि कवी वगैरे तर मुळीच नाही,त्यामुळे माझ्या पोस्ट्स मध्ये लयबद्धता आणि सुसूत्रता असण्याची शक्यता जरा कमीच आहे.पण तरीही आता राहवत नाही,जे खूप बोलायचं राहून गेल ते इथे मांडायचं आहे.

अनेकदा वाटायचं आपण पण ब्लॉग लिहावा पण आळशीपणामुळे ते आजपर्यंत साधल नाही ,असो ‘देर आये दुरुस्त आये’ अस म्हणून आजपासून ह्या लिखाणाचा शुभारंभ करतोय.आता सद्यस्थिती मध्ये डोक अगदी रिकाम आहे,पण उद्यापासून लिहण्याचा प्रयत्न करेल.अगदी तार्किक भाष्य जमणार नाही पण मोडकी तोडकी सुरुवात तरी होईल हे नक्की…शेवटी काय सुरुवात महत्वाची .