‘आकाशाशी जडले नाते’

प्रिय जयंत सर (श्री. जयंत विष्णू नारळीकर)   ,
आज तुम्ही पंच्याहत्तरी मध्ये पदार्पण करीत आहा..
तुमच्या विषयी बऱ्याच दिवसांपासून लिहायचं होत पण ते ह्या special  दिवशीच लिहिण्याचा योग आलाय..
…सर,तुमच्या खगोल ज्ञानाचे अफाट आकाश अगदी लहानपणापासून मला रुचायचे..कठीण कठीण खगोलीय प्रश्नांची सोप्या मराठी मधली तुमची लिखाणक्षमता अगदी अचंबित करणारी आहे..
मला अवकाशाची गोडी लागली ती केवळ तुमच्यामूळे..

तुमच्यातील वैज्ञानिक सर्वांना परिचित आहे पण मला भावतो तो तुमच्यातील लेखक.
आजतागायत तुमच्या लेखनाचा मी चाहता आहे, आणि  सदैव असेनही..
‘आकाशाशी जडले नाते’ मूळे जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणीपर्यंत आणि आर्यभटापासून आईनस्टाईनपर्यंत सचित्र देखण्या पानापानातून तुम्ही घडवलेली अवकाशाची सफर अगदी रोमांचित करते..

तुमची एक उत्कृष्ट लेखक म्हणून ओळख मला झाली ती ‘प्रेषित’ आणि ‘व्हायरस’ आणि तुमच्या इतर अगदी स्तंभित करून ठेवणाऱ्या लेखनामुळे..

लहान असतांना एकदा ‘आयुका’ मध्ये जाणे झाले होते..त्या आठवणी आजपण अगदी ताज्या आहेत..
‘ते’ सफरचंदाचे झाड अजूनही आठवते आणि अगदी त्याच दिवशी तुम्ही पुण्यात नव्हते हि गोष्ट अजूनही सलते..तुम्हाला भेटायची ती इच्छा एकदिवस जरूर पूर्ण होईल हि आशा..

तुम्ही आम्हाला खूप काही दिले ..तुमची साहित्याची देणगी खूप मोठी आहे आणि आज जर मराठी तरुण खगोल शास्त्राचा करिअर म्हणून विचार करत असेल किंवा जर विश्वाचे कोडे सोडवण्यासाठी त्याला काही प्रयत्न करायची इच्छा असे तर ते केवळ तुमच्यामुळे..
हा मराठी तरुण तुमचा आयुष्यभर ऋणी राहील..तुम्ही आमच्या साठी जणू  ‘यक्षांची देणगी’ आहात..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर .. येणारे अनेक वाढदिवस तुम्हाला आरोग्यपूर्ण लाभो..

जयतु जयतु जयंत !!!!Image

चला बे खेळाले…

लहानपणी जे काही खेळ चालायचे (खासकरून विदर्भ पट्ट्यातील खेळ ), त्यांची सुरुवात किंवा ज्याच्यावर ‘राज्य’ आहे त्याला जे काही बोलायला लागायचं त्यांचा हा संग्रह.

१) लपा-छुपी [म्हणजेच विदर्भातील ‘रेष्टीप’ हो  🙂 ] :
धा..वीस …तीस ….चाळीस….पन्नास……साठ……सत्तर……अंशी…….नवद्द……..शंभर…..
लपा का छुपा रे बा….डबल राज्य देणार नाही………….

२)कुकूच कु [रिंगणात खूप सारे जण आणि ज्यावर राज्य तो बाहेर]:

बाहेरचा                                                              आतली मंडळी
कुकूच कु…                                                          किसका कु ?

राजाराम का बडा भाई….                                     कायको आया ?

खेल खेलने…                                                      कोनसा खेल ?

सूर कि मुंडी…                                                      किसकी मुंडी ?

आणि मग बाहेरच्या नि ज्याची ‘मुंडी’ सांगितली त्याला आपला जीव वाचवत रिंगणाबाहेर पडावे लागे.आणि मग असाच पुढे खेळ सुरु राही.

३)नदी की पहाड?:
कोरा कागज फिक्की शाई…..
अजून डाव आला नाही…..
सांग रे गड्या,सुई का दोरा ? (एक निवडायच)
गाय का वासरू? (एक निवडायच)
नदी की पहाड????   
आणि मग ज्यावर राज्य आहे तो सहसा नदी म्हणायचा ,बाकी सारे जण विरुद्ध दिशेच्या पहाडावर जाऊन सेटल होऊन जायचे..आणि मग नदी च्या मधातून एकामेकांच्या पहाडावर जायचं…अर्थातच नदीतल्या गड्या पासून जीव वाचवत…

४)गिल्ली-दांडू मधल अब्बक…दुब्बक…तीब्बक….हे तर वर्ल्ड फेमस आहे .

ह्या सर्व खेळांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे राज्य देणाऱ्याला निवडणे..अर्थात  ‘चकणे’ .
पाचात दोन किवा तीनात एक असे करत करत जो शेवटी उरेल तो राज्य देईल…
आजकाल मुल हि खेळ खेळतात कि नाही कुणास ठावूक…पण लहानपणी खूप मजा यायची,
विष-अमृत,हात्लाव्नी,लंगडी,बर्फ-पाणी ,चोर पोलीस च्या चिठ्या,लगोरी…आणि अजून बरेच काही…

तुम्हाला जर आणखी काही खेळ आठवत असतील,किवा त्यांच्या सुरुवात करण्याच्या पद्धती जर माहित असतील तर जरूर सांगा…

एक फोटो

एका सुंदर सकाळी सहज मामांकडे गेलो होतो.नेमके कारण म्हणजे मामांच्या छोट्या मुलीचा शाळेत जाण्याचा तो पहिला दिवस होता.तो क्षण काबीज करण्यासाठी मुद्दाम मित्राचा sony cybershot घेऊन गेलो.माझी धाटूकली मामेबहीण तर तिचे फोटो काढून घेऊन हौसेने शाळेला गेली.
मी घरी परत यायला निघालो तर सहज नजर अशोकाच्या त्या कठीण खोडाकडे गेली;हळूच एक इवलेसे नाजूक पान जणू डोकावून पाहत होते.नजर काही वेळासाठी स्तब्ध होऊन त्या पानाच्या हिमतीला दाद देत होती,आणि नकळत रुपित्रा मध्ये तो साठवून मी परत आलो…..

खूप दिवसानंतर..

माझं जीवन एक बेट आहे,विशाल सागरात एकटच उभ असलेलं…दुराग्रही माझ मन वरवर थोड खट्याळ आहे,पण आतून अंतर्मुख असलेलं…आठवणी आहेत ‘शर’ समान,सफेद दगडांवर दिसून येणारी रेषा जशी नाहीशी होते अगदी तश्याच गुडूप झालेल्या…’आशा’ आहेत सुर्योदयासारख्या,जणू रोज नवीन आलोक घेऊन मार्गस्थ झालेल्या…

ह्या बेटावर खाचखळगे पुष्कळ ,आणि मित्र म्हणून फक्त संथ गतीने धावणारा वेळ.
मी फक्त समोर जातोय…पण हाच ‘वेळ’ कदाचित कट्टर शत्रू असावा,जो हे बेट सोडून खुल्या समुद्रामध्ये मला बुडी मारण्यास अटकाव करतोय..

मग मी मागे फिरतो ,पाहतो सभोवतालचा काळोख…रिकामा आणि गडद होत जाणारा…

मग अचानक डोळ्यांसमोरून तरळत जातात त्या गोड….गुलाबी…विविधरंगी…आनंदी आठवणी..
आणि मग अचानक उर येतो दाटून आणि डोळ्यात साठते क्षारयुक्त पाणी…

थांबा,मला….मला एक किरण दिसतेय ….
क्षितिजावर बहुदा तोच ‘आशेचा’ तांबूस गोळा उगवतोय….

छे..आता नक्कीच नाही…आता ह्या बेटावरून जाणे नाही…
कारण तोच सहस्त्ररश्मी मला खुणावतोय…..
तो दिवस पुन्हा येईल ….
‘आशा’ सोडू नको…..

माझी होणारी ‘गाडी’…

हं ,मला बरोबर आठवतंय जेव्हा मी लहान होतो प्रत्येकाप्रमाणे मलाही मोठ्या चारचाकी अवजड गाड्यांच आकर्षण होत.ट्रक आणि  ‘महामंडळाची बस’ हि माझी आवडती वाहने.
काळ बदलला,जस जस वय वाढू लागला माझ आकर्षण आकाराने कमी अवजड आणि कमी चाके  असलेल्या गाड्यांमध्ये वाढू लागल.जेव्हा मी १० वर्षांचा होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामांकडे यायचो आणि स्कूटर वर बसणे म्हणजे मला स्वर्गसुख वाटत होत.आणखी काळ बदलला आणखी वय वाढल आणि माझ लक्ष तब्येतीने कमी असलेल्या ‘स्लिम’ गाड्यांकडे वळाल.आता मी हिरो- होंडा च्या प्रेमात होतो…मग जेव्हा गाडी चालवायला शिकलो,तेव्हा ‘आजच आकाशी झेप घेईल ‘! अशी स्वप्ने मला पडू लागली.

मी हे विसरलो होतो कि माझे गाडी प्रेम जसे उतरत्या क्रमाने होते त्याहूनही दुप्पट वेगाने चढत्या क्रमाने पेट्रोल चे भाव वधारत होते.जेव्हा पेट्रोल चे भाव ५० रु च्या आसपास होते तेव्हा ठरवलं होत कि पदवीधर झालो कि एक ‘सुंदर’ गाडी घेऊ…पण आता असा वाटतंय एखादी नवीन ‘सायकल’ घ्यावी ;D (जेव्हा पेट्रोल ७१ रु प्रती लिटर आहे) आणखी एका वर्षाने पदवी मिळेल …गाडी पण मिळेल(?) पण पेट्रोल??? ते मिळेल? (कदाचित १५० रु प्रती लिटर ने मिळेल).आता अस वाटतंय कि अवजड गाड्यांची इच्छा बाळगत सुरु झालेले हे स्वप्न ‘सडपातळ’ सायकल वर येऊन संपेल…
आता विचार करतोय जेव्हा पृथ्वीच्या पोटातील  पेट्रोल संपेल तेव्हा काय होईल??? विचार न केलेलाच बरा.. 🙂